प्र.१. पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा :
(प्रत्येकी १ गुण)
(१) क्षेत्रभेटीदरम्यान मुलाखतीद्वारे स्थानिक लोकांकडून माहिती मिळवता येते.
उत्तर : योग्य.
(२) क्षेत्रभेटीचे नियोजन आवश्यक नसते.
उत्तर : अयोग्य
दुरुस्त विधान : क्षेत्रभेटीचे नियोजन आवश्यक असते.
(३) क्षेत्रभेट म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून केलेली सहल होय.
उत्तर : अयोग्य.
दुरुस्त विधान : क्षेत्रभेट म्हणजे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून केलेली भौगोलिक सहल होय.
(४) प्रदेशानुसार व गरजेनुसार विविध क्षेत्रांतील लोकांच्या उपजीविकेच्या साधनांत फरक पडतो.
उत्तर : योग्य.
(५) विविध क्षेत्रांतील पर्जन्यातील फरक वनस्पतींवरून समजतो.
उत्तर : योग्य.
(६) क्षेत्रभेटीदरम्यान पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवरून लक्षात येत नाही/समजत नाही.
(मार्च '१९)
उत्तर : अयोग्य.
दुरुस्त विधान : क्षेत्रभेटीदरम्यान पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवरून लक्षात येतो/ समजतो.